पुणे

आळेफाटा- आळे रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचा इशारा

CD

आळेफाटा, ता. २९ ः आळेफाटा ते आळे बस स्थानकापर्यंत महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे, अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे व आळे गावचे सरपंच मुकुंद भंडलकर यांनी दिला आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अहिल्यानगर महामार्गावरील आळेफाटा ते आळे येथील बसच्या दोन किलोमीटर परिसरात अनेक धोकादायक खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा चालू असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे हा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने या खड्ड्यात जाऊन आदळतात. येथे सतत अपघात होत आहेत. दरम्यान, आळे येथे कॉलेज व शाळा असल्याने रोज आठ ते नऊ हजार विद्यार्थी या रस्त्याने ये- जा करतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. लवकर खड्डे बुजवावेत अन्यथा आळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले असून, यामध्ये विशेष करून आळे येथील बसस्थानकाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. याबाबतची सूचना संबंधित टोल वसूल करत असलेल्या ठेकेदाराला दिल्या असून, त्यांनी या ठिकाणी असलेले खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल.

7107

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विनोबा भावेंनी दान दिलेल्या जमिनींवर बिल्डरांचा डोळा? यवतमाळमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

पाचशे-हजारासाठी भीक... 'रात्रीस खेळ चाले'ची वच्छी काय म्हणाली? बघू तुला कसं काम मिळतंय अशी धमकी दिली गेली

Online Fraud: ऑफिसच्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वापरताय? एक चूक पडू शकते महागात! व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांना सरकारचा इशारा

MS Dhoni: आयपीएल २०२७ च्या लिलावात एमएस धोनी दिसणार नाहीत? इरफान पठाणने सांगितलं CSK मधील माहीचं नेमकं काम

Latest Marathi News Live Update : डंपरखाली चिरडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; दुचाकीला धडक देत काही अंतर फरफटत नेलं

SCROLL FOR NEXT