आळेफाटा, ता. २९ : मराठवाडा आणि विदर्भात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकाची आळेफाटा परिसरात सध्या वेचणी सुरू आहे. तालुक्यात ८४ हेक्टरवर कापसाची लागवड केलेली आहे. या ‘पांढऱ्या सान्यां’स प्रतिकिलोस ७० ते ७५ रुपये बाजारभाव मिळत आहे. चांगला नफा मिळत असल्याने जुन्नरमधील शेतकऱ्यांचा कापूस पिकाच्या उत्पादनाकडे कल वाढला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात कापूस पिकासाठी पोषक हवामान आहे. या पिकाला इतर पिकांपेक्षा कमी मशागत करावी लागत असल्याने शेतकरी कापसास प्राधान्य देत आहे. आवश्यकते नुसार तीन ते चार वेळा फवारणी केली जाते. तरकारी पिकांना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. त्यांचा बाजारभाव कधी कमी तर कधी जास्त मिळतो. बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादक कापूस उत्पादनाकडे वळला आहे. खरिपात पेरणी केली की चार महिन्यांत पिकांचे उत्पादन मिळते.
उसाला पर्याय म्हणून कमी महिन्यात जास्त नफा
जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात बागायती भागात पाच वर्षांपासून कापसाचे क्षेत्र वाढले आहे. खात्रीचे व्यापारी बांधावर येऊन माल घेऊन जातात. तसेच या भागात कापूस पिकाला पोषक हवामान आहे आणि कोणत्याही रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त होत नाही त्यामुळे कीटकनाशक याचा खर्च कमी होतो व सफेद सोनं म्हणून अलीकडे याकडे आपल्याकडील शेतकरी पाहू लागला आहे. तसेच उसाला पर्याय म्हणून कमी महिन्यात जास्त नफा अशा सर्व बाबींमुळे कापूस शेती फायद्याची ठरत आहे.
यंदा कापूस फुलोऱ्यात आलेला असताना पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची गळती झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. फवारणी, वेचणी मजुरीचा खर्च मोठा असला तरी कापसाचे पीक शेतकऱ्यांचे शक्यतो नुकसान करणार पीक नाही. तसेच कापूस विकण्यासाठी साकोरी या गावात बाजारपेठ आहेत. बोरी, राजुरी, जाधववाडी या गावातील काही शेतकरी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून कापसाचे पीक आपल्या शेतात घेत आहेत.
- गणेश भोसले तालुका कृषी अधिकारी
07364
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.