पुणे

जांबुतफाटा ते बोरी बेल्हे रस्त्याची दुरवस्था

CD

आळेफाटा, ता. ३० ः जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील जांबुत फाटा ते बोरी बेल्हा या रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमामात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालक करीत आहेत.
जांबुतफाटा ते बोरी- बेल्हा हा रस्ता पुणे- नाशिक व कल्याण- अहमदनगर या महामार्गाला जोडलेला आहे. त्यामुळे पुण्याकडे, तसेच अहमदनगरकडे जाण्यासाठी या रस्त्याचा नेहमीच वापर केला जातो. या रस्त्याने गेल्यास वाहन चालकांचे सुमारे आठ ते १० किलोमीटरचे अंतर वाचते व इंधनाचीही बचत होते. मात्र, या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
बोरी बुद्रक, साळवाडी, जाधववाडी, तांबेवाडी, भोरवाडी, शिरोली या गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी नारायणगाव, जुन्नर तसेच बेल्हे
या ठिकाणी दररोज ये- जा करावी लागते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे छोटे- मोठे अपघात होत आहेत.
या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, नागरिकांचे मत आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू न केल्यास या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

जांबुतफाटा ते बोरी- बेल्हे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली असून, त्या कामाला बुधवारपासून (ता. २६) सुरुवात झाली आहे.
- सम्राट भिसे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव

07387

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT