आळेफाटा, ता. २ ः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढला आहे. आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील राजुरी गावात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे सोयाबीन आणि उसावर औषध फवारणी करण्यात आली.
दरम्यान, पेट्रोल पंपाने फवारणी केली असता एका एकरला १२०० ते १३०० रुपये खर्च येतो, तर यामध्ये वेळ व औषधेही खूप जातात. मात्र, ड्रोनद्वारे तणनाशक फवारणी केली असता एकरी फक्त ८०० रुपये घेतात, तर तीन एकर क्षेत्र असले, तर त्याचे १००० रुपये घेतले जात आहे. तसेच, या ड्रोनद्वारे सोयाबिन, बाजरी, मूग, उडीद, गहू, हरभरा, तूर तसेच, ऊस, मका यांसह इतर पिकांवर फवारणी करता येते.
याबाबत राजुरी येथील शेतकरी सुरेश कुऱ्हाडे यांनी सांगितले की, ‘‘अलीकडे शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळणारे पीक म्हणून फक्त ऊस शेतीकडे पाहिले जाते. सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून उसाला खते औषधे योग्य रीतीने दिल्यास एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पन्न मिळते. ड्रोनद्वारे वाढलेल्या उसावर कीटकनाशक, बुरशीनाशक व कांड्यांची वाढ होण्यासाठी इतर काही औषधे फवारणी घेतल्यास उत्पादन निश्चित वाढते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीत अत्याधुनिक तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा कल आहे. आमच्या शेतात ड्रोनद्वारे तणनाशक फवारणी केल्याने १० ते १५ हजार रुपयांची बचत होत असून, परिणाम चांगला आहे.’’
सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून, पंपाने औषधे मारण्यास वेळ औषधे रुपये देखील जास्त प्रमाणात जाते. मात्र, ड्रोनद्वारे औषधे मारल्यास मोठ्या प्रमाणावर बचत होते. हे मशिन इस्राईल या देशातून मागवली असून, १५ लाख रुपये त्याची किंमत आहे. हे ड्रोन बॅटरीवर ते चालत असून, १० लिटर पाणी बसेल इतकी त्याची क्षमता आहे.
- नारायण भापकर, ड्रोन मशिनचे चालक
07396
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.