पुणे

सोयाबीनला हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा

CD

आळेफाटा, ता. ३ : राजुरी (ता.जुन्नर) येथे नाफेडच्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. या केंद्रावर शेतकऱ्यांना ५३.२८ प्रतिकिलो बाजारभाव मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन पिकाला योग्य हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजुरीतील होतकरू तरुणांनी एकत्र येत विनयशील कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. या कंपनीस महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाने (नाफेड) मंजुरी दिली आहे. उत्पादनांचे त्वरित वजन, तपासणी आणि शासन निर्देशानुसार देयकाची प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असून शेती क्षेत्रात अधिक स्थैर्य आणि विश्वास निर्माण होणार आहे.
उद्‌घाटनप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली, शेळके शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, उपाध्यक्ष राजेंद्र औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कवडे, खरेदी-विक्री संस्थेचे संचालक लक्ष्मण घंगाळे, सहाय्यक कृषी अधिकारी मुकेश महाजन, ग्राम विस्तार अधिकारी संदीप ढोरे, गणेश दूध संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप घंगाळे, वैष्णव धाम फार्मर प्रोड्युसर कंपनीचे दगडू पवार, संजय हाडवळे, धिरज औटी, विक्रम डुंबरे तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोहन हाडवळे यांनी सूत्रसंचालन केले तर स्वप्नील हाडवळे यांनी प्रास्ताविक केले. अजय पवार यांनी आभार मानले.

07398

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT