पुणे

आळेफाटा परिसरात कांदा बिजोत्पादन जोमात

CD

आळेफाटा, ता. ६ : आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बिजोत्पादनासाठी लावलेले कांदे बियाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गतवर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. त्यातच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा बियाण्यांना सोन्याचा बाजारभाव प्राप्त झाला होता. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाणांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली.

मागील वर्षी एक हजार रुपयांना मिळणारे कांदा बी पाच हजार रुपयांपर्यंत पोचले होते. त्यातच कंपन्यांकडून आलेल्या बोगस बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. या भेसळयुक्त बियाण्यांमुळे ४० टक्के क्षेत्रावर डेंगळे आल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा कांदा बियाण्यांचे शेत जोमात असून, चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात बियाणे तयार केले आहे,अशी माहिती रघुनाथ हाडवळे यांनी सांगितली.
कांदा बियाणे तयार करण्यासाठी नैसर्गिक परागीकरण होणे गरजेचे असते. यासाठी मधमाशी हा महत्त्वाचा घटक असतो. अलीकडच्या काळात मधमाशांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. बेसुमार व अतिशय प्रभावी अशा कीटकनाशकांनी मधमाशीचे जीवनचक्र संपुष्टात आले आहे. परागीकरण न झाल्याने कांदा बीजोत्पादन घेणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

07408

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT