पुणे

वडगावमधील सत्यवान गागरेची मत्स्य व्यवसायात भरारी

CD

आळेफाटा, ता. १४ : वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील सत्यवान प्रभाकर गागरे या तरुणाने मत्स्य व्यवसायात भरारी घेतली आहे. त्याने ५० लाख लिटर शेततळ्यात बीज सोडून चार टनांचे उत्पादन मिळविले आहे. तिलापिया तसेच इतर माशांच्या विक्रीतून खर्च वजा जाता लाखो रुपयांचा नफा मिळाला आहे. त्याच्याकडील एका माशाचे वजन सुमारे ५०० ते ६०० ग्रॅम भरत आहे. एका किलोला १०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

सत्यवानने बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मत्स्य विभाग प्रमुख चंद्रकांत दाते यांच्या मार्गदर्शनानुसार व पत्नी सविता यांच्या अभ्यासानुसार तिलापिया मत्स्य जातीची निवड केली. शेततळ्यात सात हजार मत्स्यबीज सोडण्यात आले. त्याने १८ जून २५ रोजी या व्यवसायाची सुरुवात केली. २१ हजार रुपये किमतीचे बीज ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षणाकरिता बर्डनेट बसवण्यात आले आणि आत्तापर्यंत साधारण दीड ते दोन लाख रुपयांचे खाद्य ग्रोवेल कंपनी मार्फत देण्यात आले आहे.

नाट्यशास्त्राच्या अभ्यासासह शेतीला प्राधान्य
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वसलेल्या गागरे वस्तीवर जीवनाची गुजराण करत असताना सत्यवान गागरे यास जिरायती शेतीमध्ये उत्पन्न काढायचे कसे आणि नफा मिळवायचा कसा? हा यक्ष प्रश्न त्याच्या कुटुंबीयांसमोर होता. मात्र, एम.ए. नाट्यशास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या सत्यवानने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी पाण्याची शाश्वत सोय म्हणून बंधू विष्णुपंत गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली व या महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून मागेल त्याला शेततळे शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेतला व ५० लाख लिटर पाणी साठवण करणारे शेततळे खोदले.


बदलत्या तंत्रज्ञानानुसार व मागणीनुसार जर आपण योग्य मालाचा व योग्य वेळी पुरवठा केला तर निश्चितपणे चांगला फायदा शेतीमध्ये मिळवू शकतो. आपण शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. नवनवीन कल्पना अमलात आणल्या पाहिजेत व प्रत्येक तरुणाने शहरातल्या करिअर सोबत शेती विकसित करण्याकरता भर द्यायला सुरुवात करा, जगातले सगळे व्यवसाय जरी बंद पडले तरी शेती कधीच बंद पडू शकत नाही म्हणून आपण स्वतःला ओळखायला हवे.
- सत्यवान गागरे, मत्स्य उत्पादक

07441, 07448

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT