आळेफाटा, ता. ३१ ः विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून वर्तमानपत्र, पुस्तक वाचण्याकडे कल वाढवावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केले.
राजुरी (ता. जुन्नर) येथील जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते व कवी अविनाश भारती, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, विघ्नहर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक हाडवळे, महावितरणचे अधिकारी संतोष कोरडे, अजय कणसे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे, दिलीप घंगाळे, महेश काळे, अशोक औटी, बबन गटकळ, विवेक शेळके, विनोद औटी आदी उपस्थित होते.
यावेळी बक्षीस वितरण समारंभात वर्षभरात शालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी तसेच शैक्षणिक परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत यामध्ये लावणी, कोळीगीते, नृत्य, एकांकिका सादर केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य जी. के. औटी यांनी केले. तर सूत्रसंचालन अशोक राहींज यांनी केले. आभार पर्यवेक्षक सुनील पवार यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.