आळेफाटा, ता. ३१ ः आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवारी (ता. ३०) ३६ हजार ९१० कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारी एक नंबर कांद्यास १० किलोस २५१ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती संजय काळे व माजी उपसभापती प्रीतम काळे, कार्यालय व्यवस्थापक दीपक म्हस्करे यांनी दिली. एक नंबर नवीन कांद्यास २३० ते २५१, एक नंबर सुपर कांद्यास २०० ते २३०, दोन नंबर कांद्यास १८० ते २००, तीन नंबर गोलटी कांद्यास १६० ते १८०, तर बदला कांद्यास ३० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला आहे.