पुणे

विशाल फार्मसी महाविद्यालयात पारंपारिक दिन उत्साहात

CD

आळेफाटा, ता. १३ ः आळे (ता. जुन्नर) येथील विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात पारंपरिक दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांची संस्कृती, परंपरा व वेशभूषा सादर करून “विविधतेतील एकता” हा संदेश प्रभावीपणे दिला.
कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संस्थापक डॉ. बब्रूवाहन रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनावणे, संस्थेचे विश्वस्त विक्रांत काळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. एस. एल. जाधव, व्हीजेएसएम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. आर. ए. हांडे, तसेच सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या पारंपरिक पोशाखात सांस्कृतिक नृत्ये, भावपूर्ण सादरीकरणे व राज्य सादरीकरणे सादर केली. प्रत्येक सादरीकरणातून त्या-त्या राज्याची संस्कृती, खाद्यसंस्कृती, लोककला व परंपरा प्रभावीपणे मांडण्यात आली. या स्पर्धांचे परीक्षण परीक्षक म्हणून महेंद्र बोऱ्हाडे, भाऊसाहेब खाडे, अमोल कापसे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

Kolhapur Auto Rickshaw Drivers Protest : 42 रुपयांचा एलपीजी गॅस 80 रुपये कसा झाला? दरवाढीवरून रिक्षाचालकांचा एलपीजी गॅस पंपाला घेराव

SCROLL FOR NEXT