आळेफाटा, ता. १४ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवारी (ता. १४) ३३ हजार ८०४ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीत दहा किलोस एक नंबर कांद्यास २०१ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी उपसभापती प्रितम काळे, कार्यालय व्यवस्थापक दीपक म्हस्करे यांनी दिली.
आळेफाटा येथे मंगळवारी ३३ हजार ८०४ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रति दहा किलोस एक नंबर नवीन कांद्यास १८० ते २०१ रुपये, एक नंबर सुपर कांद्यास १६० ते १८० रुपये, दोन नंबर कांद्यास १४० ते १६० रुपये, तीन नंबर गोल्टी कांद्यास १२० ते १४० रुपये व बदला कांद्यास ३० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला.