पुणे

पिंपळगाव जोगा कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप

CD

आळेफाटा, ता. १४ ः आळेफाटा (ता. जुन्नर) या ठिकाणाहून गेलेल्या पिंपळगाव जोगा धरणाच्या डावा कालव्यात कचरा साठल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
आळेफाटा येथे मोठी बाजारपेठ असून, येथील काही नागरिक रात्रीच्या वेळी कालव्याच्या कडेला, तसेच कालव्यातही कचरा टाकत आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील सगळा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र यंत्रणा (घंटागाडीची) सोय असताना देखील या कालव्यात कचरा टाकला जात असल्याने या कालव्यात सगळीकडे कचराच दिसत आहे. या कालव्याच्या जवळच शिवछत्रपती विद्यालय व जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे जवळपास ६०० ते ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कालव्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग पडला आहे. यामध्ये प्लॅस्टिक, शिळे अन्न कुजलेल्या अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.
विद्यार्थी, नागरिकांना या ठिकाणाहून ये- जा करताना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे.
या कालव्याच्या दोन्ही बाजूने, तसेच कालव्यातसुद्धा कचरा टाकलेला दिसून येत आहे. येथील ग्रामपंचायत, जलसंपदा विभागाचे अधिकारी कालव्यात कचरा टाकू नका अशा सूचना देत असताना देखील या कालव्यात कचरा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसून येत आहे. हा कचरा साठून सडू लागल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
या कालव्यात जे नागरिक कचरा टाकत आहेत, त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

07612

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT