पुणे

पिंपळगाव जोगा डावा कालव्याला गळती

CD

आळेफाटा, ता. १६ : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणावर असलेल्या डाव्या कालव्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. कालव्याच्या कडेला असलेल्या जमिनींमध्ये पाणी साचत असल्याने त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे कालव्याचे लवकरात लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणावर असलेला कुकडी डावा कालवा हा पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा महत्त्वपूर्ण कालवा असून, या कालव्याचे काम वर्ष २००९मध्ये पूर्ण करून पाणी सोडण्यात आले होते. ओतूर, पिंपरी पेंढार, आळेफाटा, राजुरी, बेल्हा, रानमळा, तसेच पारनेर तालुक्यातील १० ते १२ गावांना याचा फायदा होत आहे. या कालव्याला जवळपास १५ ते १६ वर्षे झाले असल्याने या कालव्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी या कालव्याला शेवटचे आवर्तन जेव्हा सोडले होते, तेव्हा हे पाणी कालव्याच्याच बाजूला काही फुटांच्या अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेच्या मैदानात जाऊन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचले होते. तेव्हा ‘सकाळ’ने या संदर्भाची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाच्या वतीने तात्पुरती या ठिकाणी डागडुजी केली आहे. परंतु, कालव्याचे अस्तरीकरण निघालेले असल्याने ठिकठिकाणी गळती होत आहे. हे पाणी कालव्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे.

07624

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT