पुणे

वीजपुरवठ्याअभावी पिकांचे नुकसान

CD

आळेफाटा, ता. २० ः आळेफाटा उपविभागीय अंतर्गत आळे (ता. जुन्नर) उपकेंद्राच्या फिडरला दिवसातून पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
आळे, कोळवाडी, संतवाडी, लवणवाडी, राजुरी या गावांची लोकसंख्या ३० हजारांहून अधिक असून, पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आळे फिडरवर रोहित्रांची संख्या २० व राजुरी फिडरवर रोहित्राची संख्या ५७ इतकी आहे. या रोहित्रावर एकूण लोड ८ मेगावॉट क्षमतेपेक्षा जास्त झाला असल्यामुळे राजुरी फिडर पुरेशा दाबाने चालत नाही. दरवर्षी सहा महिने पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
दरवर्षी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पुरेशा प्रमाणात २४ तासांत आठ तास विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने फेडरवर दोन भाग करून ठराविक रोहित्रांसाठी वीजपुरवठा सोडला जातो. त्यावेळी घरातील वीज बंद असते. त्यामुळे दूध उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बिबट हल्ल्याचा धोका
राजुरी परिसरातील राजुरी, आळे, कोळवाडी, उंचखडक, संतवाडी ही गावे बिबट प्रवण क्षेत्रात मोडत असल्याने बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्या, कालवडी अशा अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्री- अपरात्री शेतात पाणी भरणे, तसेच रस्त्यावर ये- जा करणे धोकादायक बनले आहे.

तक्रार करायची कोणाकडे?
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राजुरी या ठिकाणी असलेल्या विजेच्या समस्या असतील त्या बेल्हे या ठिकाणी सांगाव्यात. बेल्हे कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की राजुरी गावातील विजेच्या समस्यांबाबत आळे येथील कार्यालयात संपर्क करावा. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT