पुणे

बाबाजी बांगर यांना कृषी पुरस्कार जाहीर

CD

आळेफाटा, ता. २१ ः सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, उमरखेड (जि. यवतमाळ) यांच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२६चा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार बोरी (साळवाडी) (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी बाबाजी बांगर यांना जाहीर झाला आहे.
नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब, शेतकरी गट स्थापन करून शेतकऱ्यांना एकत्र आणणे, तसेच शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल बांगर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांनी स्वतःच्या शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन खर्चात बचत करत उत्पन्न वाढीचा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. नैसर्गिक शेतीचे मास्टर ट्रेनर म्हणून बांगर काम करत आहेत. तसेच, बांगर यांनी आत्मा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पाचट व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, शेतीतील शाश्वत पद्धती यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध कृषी योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार उमरखेड (जि. यवतमाळ) येथे १ फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल बांगर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

07645

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT