पुणे

आळे येथील विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणामांचे धडे

CD

आळेफाटा, ता. २२ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यासावर होणारे दुष्परिणाम व मानसिक आजार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुमन व्यसनमुक्ती व मानसिक आजार उपचार केंद्र, आळेफाटा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते संदीप निकम यांनी व्याख्यान दिले.
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निकम म्हणाले की, ‘‘विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा. मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्तीवर परिणाम, वेळेचा अपव्यय, थकवा यासारखे दुष्परिणाम होतात. तसेच मानसिक आजारांमध्ये डोळे कमजोर होणे, झोप न लागणे, एकाग्रता कमी होणे, मानसिक ताण, लठ्ठपणा, हृदयविकार आणि काही गंभीर मानसिक समस्या असे आजार होऊ शकतात. यामुळे अभ्यासावर नकारात्मक परिणाम होतो. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ व वाचन यांकडे आपला कल वाढवावा.’’ या वेळी ऋषी साबळे, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, विद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी, उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT