पुणे

ढगाळ हवामानाचा कांदा पिकास फटका

CD

आळेफाटा, ता. २५ : गेल्या आठ दिवसांपासून जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचा कांदा पिकाला फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरी हवामानामुळे कांदा पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भावात वाढ झाली आहे. फवारणीच्या खर्चात वाढ होताना दिसून येत आहे.
कांदा बियाण्यांचा तुटवडा असल्याने लागवडीचा भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यातच अवकाळी पावसाचाही कांदा पिकाला फटका बसला होता. मध्यंतरी काही ठिकाणी गारपीट झाल्यानेही कांद्याचे नुकसान झाले. एकंदरीत या वर्षी कांद्याच्या भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कांद्याचे बाजारभाव चांगले असल्याने शेतकऱ्यांना या पिकातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा असताना कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.
ढगाळ हवामानामुळे कांद्यावर अळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. त्यातच इंधनाचे बाजारभाव प्रचंड वाढल्याने मशागतीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. तेही अद्याप मिळालेले नाही. दरम्यान, आदेश काढून मार्चअखेर शेती कर्जाचा भरणा करण्याची सक्ती करू नये त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कळण्यास मदत होईल.


ढगाळ हवामानामुळे कांद्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषध फवारणीमुळे भांडवली खर्चात वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे तसेच शेती पिकांना बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची पीककर्ज माफ करावीत किंवा मार्चअखेर भरावयाच्या पीक कर्जास शासनाने स्थगिती द्यावी..
- राजू गटकळ, कांदा उत्पादक

गेल्या आठ दिवसांपासून जुन्नर तालुक्यात ढगाळ हवामान तयार होत आहे. याचा कांदा पिकास मोठा फटका बसला आहे. कांद्यावर विविध किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने शेतकऱ्यांनी ताबडतोब औषध फवारणी करणे गरजेचे आहे. बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी केल्यास होणारे कांदा पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येईल.
- राजश्री नरवडे, कृषी अधिकारी, ता. जुन्नर

07663

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT