आळेफाटा, ता. २७ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनात जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नृत्य, गायन व अभिनय अशा कला प्रकारांचे सादरीकरण झाले. विकास गडगे, गुलामनबी शेख, हिरुजी कुऱ्हाडे ,ज्योती दहिफळे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
राहुल दुधवडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून केलेल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत एखादी कला जोपासण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. त्यांनी स्वतः गायन सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर झाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, खजिनदार अरुण हुलवळे, राहुल दुधवडे, गणपत लामखडे, अब्दुल रज्जाक, संदेश गटकळ, अनिल कुऱ्हाडे, सचिन डावखर, राहुल रायकर आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. ए. आर. गुळवे, पी. एस. भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रा. ए. यू. कुटे यांनी आभार मानले.