आळेफाटा, ता. ५ : आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात समितीत गाईंच्या बाजारात गाईंच्या प्रतवारीनुसार पाच हजारांपासून ९० हजारांपर्यंत विक्री झाली. संकरित जातीच्या ५४५ पैकी ४६७ गाईंची विक्री झाली.
जिल्ह्यातील चाकणनंतर सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गायांचा बाजार आळेफाटा येथे दर गुरुवारी भरत असतो. येथील बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील बाजारात अहिल्यानगर, नाशिक, ठाणे या ठिकाणांहून देखील शेतकरी गाई विक्री आणत असतात, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी उपसभापती प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे आदींनी दिली.
दरम्यान, शेतीला जोड धंदा म्हणून गायांच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. विशेष करून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील राजुरी, आळे, वडगाव आनंद, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, संतवाडी, कोळवाडी, उंचखडक या परिसरातील काही शेतकऱ्यांकडे शंभरहून अधिक गाया आहे. मात्र, सध्या दुधाचे दर जेमतेम असले तरी सुगरासचे भाव खूप वाढलेले आहेत. यामुळे अधिकचा नफा होत नाही, अशी खंत दूध उत्पादकांकडून होत आहे.
दरम्यान, यंदाचा पावसाळा चांगला झाला असल्याने सर्व शेतकऱ्यांकडे जनावरांवरासाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध असल्याने गायांना मोठी मागणी आहे.
07719
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.