पुणे

कल्पना काळे यांनी राखला जुन्नरमधील राष्ट्रवादीचा गड

CD

आळेफाटा, ता. १२ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बोरी- खोडद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना वैभव काळे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या जयश्री खंडागळे यांचा १६३२ मतांनी पराभव केला.
हा नवीन जिल्हा परिषद गट असून, या गटांमध्ये तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी शोकसभेत गावोगावी जाऊन मतदारांना आवाहन केले होते की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उभे केलेले शेवटचे उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या. त्याचा परिणाम या गटातील मतदारांवर झाला असल्याची चर्चा आहे. या गटामध्ये तिरंगी लढत झाली. कल्पना काळे, जयश्री खंडागळे (शिवसेना शिंदे) व कविता पवार (अपक्ष) उमेदवार या तिघांमध्ये लढत झाली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सून कविता पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत गेलेले माउली खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे यांना मतदारांनी डावलल्याचे दिसून आले
या गटातील बोरी गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाजी चव्हाण यांचा ७६९ मतांनी विजयी झाला. संभाजी चव्हाण यांची जनसामान्यासी जोडली गेलेली नाळ व त्यांचे सामाजिक कार्य, पारगाव ग्रामपंचायतीचे नाव जिल्ह्यामध्ये पुढे नेण्यासाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे) राजकुमार गाडगे यांचा पराभव केला. तर, खोडद गणात शिवसेनेच्या (शिंदे) माधुरी निलख यांचा १३५९ मतांनी विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रगती बढे यांचा पराभव केला.
‘‘बोरी- खोडद जिल्हा परिषदेच्या गटात जिल्हा परिषद सदस्यपदासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली मला तिकीट देण्यात आले होते. मी बोरी खुर्द गावच्या सरपंचपदी काम करत असताना नेहमी सर्वसामान्य जनतेला नेहमी न्याय द्यायचे काम केले. त्यामुळे या गटातील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले आहे. या गटातील जनतेने मला जी संधी दिली आहे, तिचे सोनं नक्की करणार आहे,’’ असे कल्पना काळे यांनी विजयानंतर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT