आळेफाटा, ता. १३ ः ग्रामीण भागात सध्या पहाटेच्या वेळी दारोदारी वासुदेव येत असल्याचे दिसून येत आहे. वासुदेव हा प्रत्येक गावामध्ये जाऊन सकाळच्या वेळी घरोघर हिंडून देवाची (पांडुरंगाची) गाणी, अभंग, गवळण म्हणत दान मागणारा लोककलाकार म्हणून ओळखले जातो.
वासुदेवाच्या डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेष असतो.
वासुदेव घरोघरी जाऊन ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’, ‘सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला’ असे म्हणत फिरत असतो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा बारामती येथील अजय गोंडे व विश्वनाथ घाडगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. मोबाइलमुळे घरातील पूर्वीप्रमाणे होणारे संवाद तुटत चालत असल्याने मोबाइलचा वापर कमी करावा, वाचन करावे, महिलांचा आदर करावा, व्यसनांपासून दूर राहावे, मांसाहार करू नये, मुलांना चांगले शिक्षण द्यावे आदी माहिती देऊन ते समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घराची परंपरा असून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात जाऊन चांगला संदेश देण्याचे काम करत असतो. वासुदेव हा समाज प्रबोधनाचे काम करतो.
-अजय गोंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.