आळेफाटा, ता. २१ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आळेफाटा (ता. जुन्नर) येथे तृतीयपंथीय समाजाकडून समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शिवभक्तांसाठी मोफत थंड पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी कार्यामुळे परिसरात सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला गेला.
तृतीयपंथीय समाजातील दाई वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित केला होता. समाजाचे आपण कुठेतरी देणे लागतो, या भावनेतून शिवभक्तांची सेवा करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नानी यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यांच्या स्मृती जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. तृतीयपंथीय समाजाने आळेफाटा मुख्य चौकात पाणी वाटप केंद्र उभारले. या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेच्या अध्यक्षा राणीबाई पुजारी यांनी केले.
यावेळी गणेश भुजबळ, वैशाली देवकर, गोरक्ष देवकर, स्वतिका डोके, कविता गागरे, सविता डोके, नीलेश भुजबळ, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
07793
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.