आळेफाटा, ता. २८ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील कुलस्वामी फाउंडेशन केंद्र संचलित सुमन पुनर्वसन केंद्रात ताणतणाव व्यवस्थापन व व्यसनमुक्ती या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचत बेल्हे येथील समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. चंद्रकांत कणसे, डॉ. सरस्वती कणसे, डॉ. निखिल कणसे, डॉ. योगेश्री कणसे, डॉ. मनोज पांढरवळे, संदिप निकम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ऋषी साबळे यांनी सुमन पुनर्वसन केंद्राची माहिती विद्यार्थ्यांना देताना सांगितले की, सुमन पुनर्वसन केंद्राच्या उपलब्ध सुविधा, सर्व उपलब्ध चाचण्या, तसेच एकूण सर्व शाखा बद्दल, संस्थेद्वारे चालणारे सर्व सामाजिक उपक्रम यांची सविस्तर माहिती सांगितली. तसेच श्रीकांत चौगुले यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच संदीप निकम यांनी मोबाइलचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. आदित्य डोईजड सरांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली.