पुणे

आळे महाविद्यालयात ‘गझलकी दुनिया’वर मार्गदर्शन

CD

आळेफाटा, ता. ५ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. जयसिंग गाडेकर यांच्या ‘गझलकी दुनिया’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना गझल म्हणजे काय, ती कशी तयार केली जाते तसेच आपल्या आयुष्यात गझलेचे महत्त्व काय आहे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गझल या काव्यप्रकाराची रचना, छंद, काफिया-रदीफ यांची माहिती उदाहरणांसह स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबतच विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा व्याख्यानमालेतून उद्याचे लेखक, कवी, गीतकार आणि उद्योजक घडण्यासाठी प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. ही योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल मंडळाची असून विद्यार्थ्यांना याचा निश्‍चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी डॉ. अर्जुन पाडेकर यांनी डॉ. जयसिंग गाडेकर यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाभारतातील अर्जुनाप्रमाणे लक्ष्यावर एकाग्र राहून शिक्षणात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. व्याख्यानाचे आयोजन विद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरुणा रवींद्र वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
प्रा. अरविंद कुटे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनुराधा वामन यांनी आभार केले. यावेळी प्रा. थोरात सर्जेराव, प्रा. पुंडे विकास, प्रा. योगेश पाडेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Latest Marathi News Update : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT