पुणे

वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात

CD

आळेफाटा, ता. ९ : आळे, राजुरी आणि उंचखडक परिसरातील डोंगरांना अज्ञात व्यक्तींकडून वारंवार लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या आगीत होरपळून मोरांचा मृत्यू झाला असून, वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जुन्नर तालुक्यातील आळे, राजुरी, उंचखडक आणि संतवाडी परिसरातील सुमारे दोन हजार हेक्टर जंगल क्षेत्र सध्या वणव्याच्या विळख्यात आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोन ते तीन वेळा अज्ञात व्यक्तींनी डोंगराला आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत झाडे-झुडपे जळून खाक झाली असून मोर, ससा, हरीण, कोल्हा यांसह विविध पक्ष्यांच्या अधिवासाला मोठा फटका बसला आहे. विशेषतः आगीत होरपळून मोरांचा मृत्यू झाल्याने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी पाच हजार लिटर क्षमतेचे पाणवठे तयार केले आहेत. मात्र, प्राण्यांची संख्या पाहता हे पाणवठे अपुरे पडत आहेत. त्यातच वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वणवा लावणाऱ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Maharashtra: हरित महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; वृक्षलागवड लक्ष्य तर वृक्षतोडीस सुलभ परवानगी, तीनशे कोटी झाडे लावणार, आयोग काय करणार?

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे जमीन हादरली! भूकंपाचं केंद्र 150 किलोमीटर खोल; किती होती तीव्रता?

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

SCROLL FOR NEXT