पुणे

वडगाव आनंद येथील शाळेत संगणकीय कक्षाचे उद्‍घाटन

CD

आळेफाटा, ता. १० : पुणे जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेल्या व वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील डी. बी. वाळुंज यांच्या विशेष प्रयत्नातून येथील जि. प. शाळेसाठी एक नवीन वर्गखोली मंजूर करून उभारली असून तिचे उद्‍घाटन तसेच शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक यांच्या प्रयत्नातून वातानुकूलित संगणक कक्ष व त्यामध्ये एकाचवेळी एकूण २६ संगणक उपलब्ध केले असून या वातानुकूलित संगणक कक्षाचे उद्‍घाटन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या सपना शिंदे, माजी सभापती संगीता वाघ, सरपंच रेलिका जाधव, दत्तात्रेय वाळुंज, संतोष पादिर, नवनाथ वाळुंज, दत्तात्रेय चौगुले, सचिन देवकर, सचिन गाडगे आदी उपस्थित होते.
दरम्यान येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी परसबाग तयार केली असून या बागेत विविध प्रकारच्या भाज्या पिकलेल्या असून या परसबागेचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करत असतात, शनिवारी या बागेत पिकविलेल्या भोपळ्यापासून बनवलेल्या भोपाळ गाऱ्याचे मिष्टान्न भोजनाचे आयोजन शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीने केले होते. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका छाया डुंबरे, सुनंदा तांबे, सविता खेत्री. गीतांजली बोऱ्हाडे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रेय चौगुले व शिक्षण तज्ज्ञ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डी. बी. वाळुंज यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT