आळेफाटा, ता. १२ : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा (ता. जुन्नर) बाह्यवळण परिसरात बेजबाबदार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायतीने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अहिल्यानगर- कल्याण आणि पुणे- नाशिक महामार्गाचे केंद्र असलेल्या आळेफाटा शहराचा विस्तार मोठा आहे. या शहराचा भाग आळे आणि वडगाव आनंद अशा दोन ग्रामपंचायतींच्या हद्दीत येतो. बाजारपेठ आणि हॉटेल व्यवसायामुळे येथे कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून प्लॅस्टिक पिशव्या आणि पोत्यांमध्ये भरून कचरा महामार्गाच्या कडेला टाकला जातो. तसेच, मांस विक्रेत्यांकडून टाकला जाणारा कचरा कुजल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे.
आळे ग्रामपंचायतीने घंटागाडीची सोय केली असतानाही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून दोन्ही ग्रामपंचायतींनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांकडून केली जात आहे.
सीसीटीव्हीची गरज
पुणे- नाशिक महामार्गावर ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, तिथे आळे व वडगाव आनंद ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास दोषींवर कारवाई करणे सोपे होईल. प्रशासनाने तातडीने ही पावले उचलणे गरजेचे आहे.
07887
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.