पुणे

बहुरूपी बांधवांना आर्थिक झळ

CD

आळेफाटा, ता. २७ : वाढती पाणीटंचाई आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे पारंपरिक बहुरूपी कला जोपासणाऱ्या समाजावर आर्थिक संकट ओढवले आहे. गावोगाव भटकंती करूनही पुरेशी देणगी मिळत नसल्याने या कलाकारांचा उदरनिर्वाह कठीण झाला असल्याचे चित्र आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात पाहावयास मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गुप्तहेर आणि मनोरंजनाची धुरा जोपासणारा हा समाज आजही आपली परंपरा टिकवून आहे. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील युवा बहुरूपी बबन शेगर हा तरुण आपले पहिलीपर्यंतचे शिक्षण सोडून वडिलांच्या आजारपणामुळे ही कला जोपासत आहे. डॉक्टर, वकील, हवालदार अशा विविध भूमिकांतून तो लोकांचे मनोरंजन करतो. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक देणगी आणि धान्य देताना हात आखडता घेत आहेत.
‘‘शासनाकडून कोणतेही मानधन मिळत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मदत मिळाल्यास ही भटकंती थांबेल,’’ अशी खंत बबन शेगर यांनी व्यक्त केली. टीव्ही आणि सोशल मीडियामुळे या कलेचा प्रभाव कमी होत असून, शासनाने या लोककलेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

07956

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

SCROLL FOR NEXT