आळेफाटा, ता. १७ : कुकडी प्रकल्पातील व जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या चिल्हेवाडी धरणाच्या बंद पाइपलाइन कामाची माजी आमदार अतुल बेनके यांनी राजुरी येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सिंचन सुविधेबाबत तांत्रिक माहिती दिली.
याप्रसंगी गावचे माजी सरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, जयसिंग औटी, बी. टी. डुंबरे, प्रदीप डुंबरे आदी उपस्थित होते. दरम्यान, जुन्नर तालुक्यात चिल्हेवाडी हे मध्यम प्रकल्पाचे धरण असून या धरणाची साठवण क्षमता एक अब्ज घनफूट (एक टीएमसी) एवढी आहे. या धरणाचे काम २००० मध्ये पूर्ण झाले असून बंद पाइपलाइन कामासाठी पहिल्यांदा २०१०मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.
२१ गावांना २१ गावांना सिंचनाचा लाभ
चिल्हेवाडी, पाचघरवाडी, आंबेगव्हाण, रोहकडी, ओतूर, डुंबरवाडी, खामुंडी,गायमुखवाडी, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, जांभुळ पट, नवलेवाडी, आळेफाटा, आळे, राजुरी, गुंजाळवाडी, बेल्हे , बांगरवाडी आदी २१ गावांना बंदिस्त नलिकेच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे.
जुन्नरच्या पूर्व भागातील ७ हजार ६९७ हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.