पुणे

पशुधन आरोग्यावर राजुरीत मार्गदर्शन

CD

आळेफाटा, ता. २० : पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार, स्वच्छता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. तसेच पशुपालन व्यवसायात महिलांचा सहभाग वाढल्यास आर्थिक प्रगती वेगाने होईल, असे प्रतिपादन राजुरी येथील मार्गदर्शन चर्चासत्रात करण्यात आले. राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था आणि चेन्नई येथील स्काय ईसी ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स यांच्यातर्फे बुधवारी (ता. १७) पशुपालक, शेतकरी व महिला बचत गटांसाठी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या वेळी स्काय ईसी ड्रग्सचे प्रॉडक्ट मॅनेजर डॉ. अभिजित वळेकर यांनी पावसाळ्यातील चारा व्यवस्थापन, पाणी आणि गोठ्याची स्वच्छता यावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारप्राप्त श्रद्धा धवन यांनी ‘महिलांचा पशुपालनातील सहभाग’ यावर माहिती देताना कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीतील महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष औटी, उपाध्यक्ष दिलीप घंगाळे, तुकाराम डुंबरे, साईनाथ हाडवळे, विक्रम डुंबरे, मोहन हाडवळे, संजय औटी, सचिव निवृत्ती हाडवळे, अजय पवार व शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन गंगाराम औटी यांनी केले, तर बंटी हाडवळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT