पुणे

जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे विभागानुसार प्रशिक्षण

CD

बेल्हे, ता. ६ : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ८ जानेवारी ते १० जानेवारी व ता. ११ ते १३ जानेवारी दरम्यान दोन ठिकाणी विभागानुसार प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान याबाबतची मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी, यापूर्वीच पंचायत राज पुणेचे संचालक आनंद भंडारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.


याबाबत पांडुरंग पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्य सरकारच्या ग्रामपंचायत विभागाने पत्राद्वारे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, सातारा या कार्यालयास जुन्नर पंचायत समितीकडून २७८ सरपंच सदस्यांची यादी प्राप्त झाली आहे.

त्यानुसार ता. ८ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान जुन्नर तालुक्यातील सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, नारायणगाव, निमगिरी, खटकाळे, राळेगण, धालेवाडी तर्फे मिन्हेर, खामगाव, सुकाळवेढे, पाडळी, बुचकेवाडी, पारुंडे, उंब्रज नं. १, पांगरी तर्फे मढ, वाणेवाडी या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य या एकूण १५१ सदस्यांसाठी आदिवासी विकास प्रबोधन जुन्नर येथे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. तर ११ ते १३ जानेवारी २०२४ दरम्यान राजुरी ग्रामपंचायत सभागृहात पिंपळवंडी, कांदळी, वडगाव आनंद, बांगरवाडी, रानमळा, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी (बेल्हे), गुळुंचवाडी, बेल्हे, पिंपरी कावळ, तांबेवाडी या ग्रामपंचायतींच्या एकूण १२७ सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: डीएनएत पिता नसल्यास मुलाच्या पालनपोषणासाठी पोटगी नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, काय होता खटला?

बारामतीत २०२९ ला जय पवारांची एंट्री? लोकांची इच्छा, पण निर्णय बाकी… जय पवारांचं सूचक विधान!

Kolhapur Businessman Tragedy: अत्यंत श्रीमंत परिसरातील एका व्यावसायीकाने दुकानातचं घेतला गळफास, कामगाराने दुकान उघडलं अन्...

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांसह जय पवार आणि पार्थ पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Kalpana Kharat: जमीन व्यवहार प्रकरणी कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; अशोक खरातची प्रकृती बिघडली, न्यायालयात काय घडलं!

SCROLL FOR NEXT