पुणे

आणे पठारावरील गावांमध्ये दुपारपर्यंत धीम्या गतीने मतदान

CD

बेल्हे, ता. १३ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील गावांमध्ये कुकडी प्रकल्पामधून शेतीसाठी उपसा सिंचन योजना राबविण्याच्या मागणीबाबत वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मतदानावरील बहिष्काराचा निर्णय नागरिकांनी स्थगित करून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. दरम्यान उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने दुपारपर्यंत मतदान अतिशय धीम्या गतीने सुरू होते.

आणे पठार भागातील आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा या दुष्काळी पट्ट्यातील गावांनी कुकडी प्रकल्पामधून शेतीसाठी उपसा सिंचन योजना राबविण्याच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठराव ग्रामसभांमध्ये संमत केले होते. याबाबत कुकडी प्रकल्पामधून आणे पठारभागासाठी उपसासिंचन योजना राबविण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा येथील ग्रामस्थांनी मतदानाचे कर्तव्य बजावत मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

दरम्यान, सर्व मतदारांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे, असे आवाहन आणे पठारभाग पाणीसंघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते. बेल्हे परिसरातील गावांमध्येही उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारपर्यंत मतदान अतिशय संथ गतीने सुरू होते. मात्र ऊन कमी झाल्यावर सायंकाळी मतदानासाठी गर्दी वाढू शकते, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT