पुणे

बेल्हे येथे रंगले राज्यस्तरीय ग्रामीण काव्यसंमेलन

CD

बेल्हे, ता. ६ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे संत कबीर व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य व आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन बेल्हे यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय ग्रामीण काव्य संमेलनाचे’ आयोजन केले होते.
बेल्हे येथे आयोजित या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक डॉ. ख. रा. माळवे हे होते. याप्रसंगी प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, श्री साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव जगताप, बाळासाहेब सोनवणे, मनोज जाधव, भावना खोब्रागडे, विलास अटक, उपसरपंच राजेंद्र पिंगट, विजय गुंजाळ, माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, दिपाली मटाले, डॉ. दत्ता खोमणे, अप्पा मुलमुले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खेडकर म्हणाले की, कवी, लेखक हा कला क्षेत्राचा कणा आहे. यावेळी त्यांनी तमाशाशी निगडीत असलेल्या कवींची माहिती दिली. यावेळी संबंधित दोन्ही संस्थांच्या वतीने, येथील सामाजिक कार्यकर्ते किसनराव देशमुख यांना समाजभूषण पुरस्कार तर गंगाधर साळवे यांना कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी ग्रामीण भागातील कवींनी सादर केलेल्या काव्यरचानांनी काव्यरासिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी जयद्रथ आखाडे, शब्दस्वरा मंगरुळकर, बाबाजी शिरतर, शितल भगत, पुजा सोनवणे, कैलास औटी, सचिन औटी, नवनाथ शिरतर, अप्पा मुलमुले, सावकार पिंगट, गजानन घोडे, माजी सरपंच पाराजी बोरचटे, सागर लामखडे, राजेंद्र गफले यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. सतिश शिंदे व प्रतिमा काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ‘आम्ही भारतीय’ सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अल्पेश सोनवणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT