पुणे

चव्हाण यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार

CD

बेल्हे, ता. १ : पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील तरुण कृषी पदवीधर प्रगतशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांना, नुकताच (ता. ३०) नाशिक येथे कृषिभूषण एफपीओ स्टार्टअप फेडरेशन महाराष्ट्रतर्फे ऊस उत्पादन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार २०२५'' समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परिसरात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, मेघालयच्या जैवविविधता प्रकल्पाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. सूर्या गुंजाळ, नाशिकचे आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, कृषी भूषण महाराष्ट्र स्टार्टअप फेडरेशनचे अध्यक्ष भूषण निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकास चव्हाण यांना, ‘कृषिनिष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविलेले आहे. त्यांनी सलग सात वर्षे एक एकरात शंभर टनांपर्यंतचे ऊस उत्पादन घेण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन चळवळ सुरू केली. ‘सुपर केन नर्सरी’ तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार राज्यभर केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दोन्हीही वाढल्याचे सांगण्यात आले. तसेच विकास चव्हाण यांनी स्वतःच्या शेतावर आतापर्यंत २५ पेक्षा जास्त शेतकरी मेळावे, शेती शाळा व चर्चासत्रे आयोजित केले आहेत.
02498

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray: 'तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले'; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT