पुणे

बेल्हे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीला मुहूर्त

CD

बेल्हे, ता. १४ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाला मुहूर्त मिळाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम मार्गी लागले आहे. नुकतेच येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्राम सचिवालयाच्या नूतन इमारतीचे काम, स्थानिक मंडळींच्या मतमतांतरांमुळे गेले अनेक वर्षे रेंगाळले होते. कार्यालयाच्या प्रशस्त अशा नूतन इमारतीसाठी एकूण तीन कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, शासनाच्या नागरी सुविधा योजनेतून ८० लाख रुपये व वित्त आयोग निधीतून ६० लाख रुपये असा जवळपास एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी बांधकामासाठी उपलब्ध झाला आहे. या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, तसेच ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच, येथील गावठाण परिसरात बगीचा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद विकास निधीतून २० लाख, स्मशानभूमीत शवदाहिनी घुमट बांधकाम करण्यासाठी २० लाख, स्मशानभूमीत स्नानगृह व स्वच्छता गृह बांधण्यासाठी २० लाख, एस. टी. बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी २० लाख निधी उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Katha Arunachi Marathi Play : मिलिंद शिंदे यांची 'कथा अरुणाची' नाटकातील संघर्षमय यात्रा

कुंभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मंगळ-बुध युतीचा प्रभाव, गुढीपाडव्यापासून शुभ संकेत

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

SCROLL FOR NEXT