बेल्हे, ता. ३० : नळवणे (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ३०) पहाटे चंद्रकांत देशमुख यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्यास, वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढून माणिकडोह येथील बिबट्याच्या निवारा केंद्रात हलवले आहे. येथे रविवारी सकाळी लक्ष्मण देशमुख यांना त्यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी वनविभागाला कळवले. दरम्यान, या विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने, भक्षाचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असे वनविभागाने सांगितले. विहिरीत पडलेल्या बिबट्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्नात, विद्युत मोटारीचा पाइप व केबलचे काही प्रमाणात नुकसान केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.