पुणे

बिबट्यांच्या बंदोबस्ताची बेल्हे परिसरामध्ये मागणी

CD

बेल्हे, ता. ९ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील शिंदेमळा-हौदबाग परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यासह दोन मोठ्या बछड्यांचा वावर वारंवार आहे. वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
भरदिवसाही बिबट्या ग्रामस्थांना वावरताना दिसत असल्याने शेतीतील काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अनेक पाळीव कुत्री बिबट्याच्या भक्षस्थानी पडली आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. ८) दुपारी हौदबाग परिसरातील केळीच्या पिकात पूर्ण वाढ झालेला बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. दरम्यान, बिबट्याच्या भीतीमुळे शेती कामासाठी मजूर येण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. सध्या अनेक ठिकाणी कांदा लागवडी सुरू असून, शेतकरी मंडळींना जीव मुठीत धरून शेतात काम करावे लागत असल्याचे शेतकरी संदीप बबन शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT