बेल्हे, ता. १८ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे श्री बेल्हेश्वर विद्यालयात आयोजित सकाळ बाल चित्रकला स्पर्धेनिमित्त रंगरेषांच्या दुनियेत लहानगे विद्यार्थी हरवून गेले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन श्री बेल्हेश्र्वर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ व पर्यवेक्षक डी. टी. खोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील श्री बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे, तसेच भाग शाळा साकोरी, मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री बेल्हेश्वर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षिका व्ही. के. गाढवे, चित्रकला शिक्षक प्रताप चिंतामणी, ए. एस. भागवत, जी. ए. बंगाल, श्रीमती डी. एल. दराडे, श्रीमती एस. ए. सुपेकर, संजय तांबे, नीलेश गुंजाळ आदींनी परिश्रम घेतले. बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष डुकरे यांनी भेट देऊन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.