पुणे

बेल्हेमधील ६३ विद्यार्थ्यांची ट्रेनिंगसाठी निवड

CD

बेल्हे, ता. १४ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील विविध ट्रेड्समधील ६३ विद्यार्थ्यांची, नुकतीच चाकणच्या बजाज ऑटो लि. या कंपनीमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ (OJT) साठी निवड झाली आहे.
  बेल्हे येथील समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी ही माहिती दिली. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव मिळणार असून त्यांच्या कौशल्यविकासाला मोठी चालना मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून राबविण्यात येणाऱ्या ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया, सुरक्षितता, नियम, कार्यसंस्कृती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होणार असल्याचे मत प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी शिस्त व कौशल्य आत्मसात करून उद्योगविश्‍वात संस्थेचे नाव उज्वल करावे असे आवाहन संस्थेचे विश्‍वस्त वल्लभ शेळके यांनी व्यक्त केले. चाकणच्या बजाज ऑटो लि. यांच्या वतीने गणेश जाधव, प्रशांत मगर, प्रथमेश देसाई, गणेश खुटवळ यांनी संबंधित प्रशिक्षणार्थींची निवड केली. संस्थेच्या वतीने संबंधित प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

Gold And Silver: सेबी गोल्ड-सिल्व्हर ईटीएफ नियमांमध्ये सुधारणा करणार? गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार; नवा नियम काय?

SCROLL FOR NEXT