बेल्हे, ता. १७ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील व समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकतेच बंगळूर येथे आयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प अन्वेषण या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
संबंधित विद्यार्थ्यांना ४० हजार रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेल्हे येथील समर्थ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे व समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी ही माहिती दिली. बंगळूर येथे अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगळूर व सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च यांच्या वतीने या प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्पर्धा सॅमसंग सेमिकंडक्टर इंडिया रिसर्च यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले प्रीतम बर्वे, श्रुती वाकचौरे व समर्थ गुरुकुलमधील अवधूत भांबेरे, श्रद्धा आग्रे या ग्रुपने सादर केलेल्या व्हर्साटाईल सर्व्हीस बोट या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला. ४० हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
स्मार्ट रोबोट प्रश्नांची उत्तरे देणारा तसेच एआय प्रणाली, मानवी चेहरा ओळखणारी प्रणाली विकसित करणे यासाठी या प्रकल्पाचा वापर करण्यात आल्याचे विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.