बेल्हे, ता. २३ : बेल्हे ( ता. जुन्नर) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शंभर टक्के अनुदानावर भुईमूग व तीळ बियाणे उपलब्ध होणार असल्याने ऑनलाइन अर्ज भरले आहेत. मात्र तेलबिया लागवडीचा उन्हाळी हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना उलटूनही अद्यापपर्यंत शासनाकडून बियाणे उपलब्ध होऊ शकलेले नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाच्या कृषी विभागाकडून तेलबिया उत्पादन वाढीसाठी शंभर टक्के अनुदानावर भुईमूग व तीळ बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी रीतसर ऑनलाइन अर्ज भरले असल्याचे शिवाजी डुंबरे यांचे म्हणणे आहे. साधारण ता. १५ जानेवारीच्या उन्हाळी भुईमूग लागवडीचा हंगाम असतो. मात्र जवळपास एक महिना उलटूनही अद्यापपर्यंत शासनाकडून बियाणे उपलब्ध होऊ शकलेले नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना जो आगोदर ऑनलाइन अर्ज करील त्याला (प्रथम येईल त्याला प्राधान्य) या तत्त्वावर शंभर टक्के अनुदानावर भुईमूग व तीळ बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान पंधरा जानेवारी पासून शेतकरी भुईमूग पेरायला सुरवात करतात. शासनाच्या कृषी विभागाने उन्हाळी भुईमूग बियाणे लवकरात लवकर उपलब्ध करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने शिवाजी डुंबरे यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत जुन्नरचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, याबाबतचा प्रोग्राम आलेला आहे मात्र बियाणे अद्यापपर्यंत आलेले नाही. बियाणे उपलब्ध झाल्यावर ते संबंधित शेतकऱ्यांना वाटप केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.