पुणे

फिलिपिन्सच्या महाविद्यालयासोबत ‘समर्थ’चा शैक्षणिक सामंजस्य करार

CD

बेल्हे, ता. ९ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि फिलिपिन्सच्या कॅटबालोगन सिटी कम्युनिटी कॉलेजमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कॅटबालोगन सिटी कम्युनिटी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. निगेल एल. कॉर्नजो आणि समर्थ कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. नवनाथ नरवडे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर, प्रा. रतिलाल बाबेल, प्रा. तानाजी वामन, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर आणि प्रा. सचिन पोखरकर उपस्थित होते.
या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, आणि शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता वाढणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सेमिस्टर पूर्ण करण्याची संधी, औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होता येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळावा, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके आणि प्रा. राजीव सावंत यांनी या उपक्रमाचे स्वागत करून संबंधितांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

Latest Marathi News Live Update : Solapur Aircraft Accident: सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरले; महिला वैमानिक सुरक्षित

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

SCROLL FOR NEXT