पुणे

धामणीत ज्येष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून चोरी

CD

पारगाव, ता. १७ : धामणी (ता. आंबेगाव) येथील जाधवमळ्यात गुरुवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी ज्येष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून धक्काबुक्की करत चाकूने धाक दाखवून अंगावरील पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये, असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
धामणी येथील जाधवमळ्यात पोंदेवाडी रस्त्यावर गोविंद भगवंत जाधव (वय ७७) यांचे एकांटी घर आहे. ते व त्यांची पत्नी नंदा (वय ७०) हे दोघेच राहतात. त्यांची मुले व नातवंडे बाहेरगावी असतात. गुरुवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजता चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजाची कडी तोडून आत येत या ज्येष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत धक्काबुक्की करत गोविंद जाधव यांच्या हातातील एक दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दुसरी अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, तसेच नंदा गोविंद जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी व अर्धा तोळे वजनाचा कानातील दागिना, एक नथ; तसेच घरातील रोख पाच हजार रुपये, असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी जाताना जाधव यांच्या मोबाईलमधील बॅटरी काढून घेतली. तसेच, घराला बाहेरून कुलूप लाऊन घराच्या लाइटची वायर तोडून चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी जाताना बाहेरून कुलूप लावल्याने या ज्येष्ठ दांपत्यास काहीही करता आले नाही. रात्रभर ते मोठमोठ्याने ओरडून आवाज देत होते. परंतु, जवळ दुसरे कोणतेच घर नसल्याने कोणालाही आवाज आला नाही. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही अंतरावर घर असलेले सुनील गुलाब जाधव यांना गोविंद जाधव यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
सुनील जाधव यांनी माजी सरपंच सागर जाधव, वसंतराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव , माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा जाधव व कैलास जाधव यांना बोलावून घेतले. तसेच, पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे व पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT