पुणे

शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत वापरण्याकडे कल

CD

पारगाव, ता. ३ : पावसाळा जवळ आल्याने शेतातील पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतात खत पांगवण्याची लगबग सुरू आहे. अलीकडच्या काही वर्षात रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती त्यातच खताच्या वाढत्या वापरामुळे जमिनीवर तसेच मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत वापरण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे, त्यामुळे शेणखताला मागणी वाढली आहे.
शेतात पेरणीचे खरीप व रब्बी असे दोन हंगाम असतात पावसाळ्याच्या हंगामाला खरीप व दिवाळीच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात खरिपात बाजरी व विविध प्रकारचे कडधान्य ही पारंपरिक पिके त्याच बरोबर शेतकरी शेतात नगदी पीक म्हणून ऊस, कांदा व तरकारी पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतात. तालुक्यातील सातगाव पठार तसेच पूर्व भागातील शिरदाळे भागात खरिपात पावसाळी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पूर्व भागात रब्बीतही बटाटा लागवड केली जाते. त्याच बरोबर गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आणि बाजरी हि पिकेही घेतली जातात.
अलीकडच्या काही वर्षात रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती त्यातच रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीवर तसेच मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परीणामामुळे शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे शेणखताला तसेच कोंबडी खताला मागणी वाढली आहे. जे शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात त्यांच्याकडे जनावरे मोठ्या प्रमाणावर असल्याने शेणखत मोठ्या प्रमाणावर मिळते वर्षातून दोनदा हे शेतकरी खताची विक्री करतात. एक ट्रक्टर डपिंग ट्रॉली शेणखत ३५०० रुपयांना मिळते असे अवसरी बुद्रुक येथील शेणखताचे व्यापारी अरुण सीताराम हिंगे यांनी सांगितले तर कोंबडी खताची एक ट्रक्टर डपिंग ट्रॉली ४५०० रुपयांना मिळते अशी माहिती अवसरी खुर्द येथील कोंबडी खताचे व्यापारी धनंजय ढुमणे यांनी सांगितले. शेणखत ट्रॉलीत भरणे, शेतात पांगवणे तसेच वाहतूक खर्च वेगळा घेतला जातो .

02582

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT