पुणे

गवारी उत्पादकांत बाजारभावाअभावी निरुत्साह

CD

पारगाव, ता. ६ : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तरकारी मालाचे उत्पादन घटले आहे. सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावात गवार निघण्यास सुरुवात झाली आहे. उत्पादन चांगले निघूनही मागणी अभावी गवारीच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही. यामुळे गवार उत्पादकांमध्ये निरुत्साह असल्याचे चित्र दिसत आहे.

लोणी, धामणी, खडकवाडी व जारकरवाडी तसेच पोंदेवाडी, लाखणगाव परिसरातील अनेक शेतकरी कमी पाण्यावर जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून गवारीचे उत्पादन घेतात. मात्र सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे सर्वत्रच पाण्याचा तुटवडा भासत आहे. यामुळे तरकारी मालाच्या उत्पादनात घट झाली आहे. मात्र गवारीचे उत्पादन चांगले निघत आहे.
लाखणगाव येथील राहुल ज्ञानेश्वर पाचारणे व दीपक ज्ञानेश्वर पाचारणे या बंधूंनी एक एकर क्षेत्रात गवारीचे पीक घेतले. लागवडीनंतर दोन महिन्यांनी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. पहिला तोडा तीन दिवस चालला. यातून सुमारे दोन हजार किलो गवारीचे उत्पादन मिळाले. त्यास प्रती १० किलोस २५० ते ३०० रुपये बाजारभाव मिळत आहे. गवार पिकासाठी मजुरीवर जास्त खर्च येत आहे. गवार तोडण्यासाठी एक एकर क्षेत्राला एका दिवसाला १८ ते २० महिला मजूर लागतात प्रत्येक मजुराला ३०० रुपये रोज द्यावा लागतो. शिवाय त्यांना वाहन पाठवून आणावे लागते.

एकंदरीत हा खर्च पाहता सध्याच्या परिस्थितीत बाजारभाव नसल्याने अत्यल्प नफा मिळत आहे. त्यामुळे गवार उत्पादकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. मागील वर्षी गवारीच्या प्रती १० किलोला ९०० ते ११०० रुपये उच्चांकी भाव मिळाला होता. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर सुट्टीला बाहेरगावी गेलेले पुन्हा शहरामध्ये परतल्यावर गवारीला मागणी वाढेल. त्यामुळे बाजारभावात ही वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
-महेंद्र वाळुंज, वाळुंजनगर (ता. आंबेगाव)

02596

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT