पुणे

वीज चोरून वापरणाऱ्यांविरुद्ध पारगाव पोलिस ठाण्यात तक्रार

CD

पारगाव, ता. १७ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ४५ लोकांनी अनधिकृतपणे चोरून वीज वापरली. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून संबंधित व्यक्तींच्या विरुद्ध महावितरण कंपनी निरगुडसर कार्यालयाच्या वतीने पारगाव कारखाना पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
महावितरण कंपनीने जेवढे वीजबिल संबंधितांना आकारलेले आहे तेवढे वीजबिल त्यांनी भरावे. सदर बिल भरल्याची पावती पोलिस ठाण्यात आणून दाखवावी, अन्यथा वारंवार सांगून देखील वीजबिल भरणार नाहीत, अशा व्यक्तींच्या विरोधात वीज चोरीचे गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक लहूजी थाटे यांनी दिली आहे.
दरम्यान, ज्या लोकांना सांगून देखील ते वीजबिल भरले नाहीत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. राहिलेल्या लोकांनी वीजबिल भरावे. अन्यथा त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबंधित लोकांनी बिल भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन थाटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT