पुणे

शिरदाळेकरांची १८ दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट

CD

पारगाव, ता. १८ : शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे मागील १८ दिवसांपासून वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होत आहे. सार्वजनिक पाणी पुरवठ्याची मोटार बंद पडल्याने १८ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. उन्हात पायपीट करत डोक्यावरून पाणी वाहून आणावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले जाईल, असा इशारा उपसरपंच मयूर सरडे यांनी दिला आहे.

शिरदाळे गावात पिण्याच्या तसेच वापरण्याच्या पाण्याचा तसा जास्त तोटा कधी येत नाही. येथील तळ्यातून पुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी मिळते. मात्र वीज रोहित्रावरील बाटला जळाल्याने तो दहा दिवसानंतर बसवण्यात आला. तर ट्रान्सफार्मरच्या दुरवस्थेमुळे केबल जळाली. ज्यावेळी बाटला जळाला होता त्यावेळी देखील तो उशिरा बसवण्यात आला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून भर उन्हाळ्यात हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात काही ज्येष्ठ, काही अपंग लोक आहेत त्यांना पाणी वाहने शक्य होत नाही. त्यांची देखील खूप गैरसोय होत आहे. यामुळे लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

ट्रान्सफॉर्मरच्या दुरवस्थेमुळे घटनेची शक्यता
ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था झाली असून फ्यूज फुटलेले आहे. ट्रान्सफॉर्मर शाळेच्या व गावाच्या लगत असल्यामुळे आणि एखादी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते देखील काम होणे गरजेचे असल्याचे सरपंच वंदना तांबे, माजी सरपंच मनोज तांबे, ग्रामपंचायत सदस्य बिपिन चौधरी, जयश्री तांबे, सुप्रिया तांबे, गणेश तांबे यांनी सांगितले.


02635

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT