पुणे

सरसकट पंचनामे करून भरपाई मिळवून देणार

CD

पारगाव, ता. २८ : आंबेगाव तालुक्यात पूर्व भागातील मांदळेवाडी, वडगावपीर, रानमळा, वाळुंजनगर, खडकवाडी, पोंदेवाडी, धामणी लोणी भागात अवकाळी व गारपीटीने मोठे नुकसान झाले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सोमवारी (ता.२७) थेट शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी ग्वाही दिली.

ऊस, बटाटा, कांदा, गहू, कांदा रोपे, काकडी, फळबागा, जनावरांचा हिरवा चारा यांवर मोठ्या गारा पडल्यापिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पशुधन, निवारा शेडला अवकाळीचा फटका बसला आहे. त्याची पाहणी करताना विवेक वळसे पाटील म्हणाले, की सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सर्व नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, शरद बँकचे संचालक अशोक आदक पाटील, संतोष टाव्हरे, सुनील वळसे, महेंद्र वाळुंज, अशोक वाळुंज, बाळशिराम वाळुंज, राजू सिनलकर, सतीश थोरात, माऊली आदक यांसह स्थानिक सरपंच व शेतकऱ्यांसमवेत पाहणी केली.

03406

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT