पुणे

मांदळेवाडी सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन

CD

पारगाव, ता. ३ : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री हनुमान मंदिराच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त श्री अखंड हरीनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे आयोजन केले असून त्यानिमित्त शनिवार (ता. ४) ते शनिवार (ता. ११) पर्यंत कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, अखंड विना वादन, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ७ ते ९ हरिकीर्तन, रात्री ९ ते १० महाप्रसाद व नंतर हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. शनिवार (ता. ४) संतोष महाराज मोरे (बीड), रविवार (ता. ५) एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (जालना), सोमवार (ता. ६) ज्ञानेश्वर महाराज महाराज शिंदे (आळंदी), मंगळवार (ता. ७) कबीर महाराज आतार (खेड शिवापूर), बुधवार (ता. ८) पोपट महाराज पाटील (कासारखेड, जळगाव), गुरुवार (ता. ९) सुनील महाराज झांबरे (बीड), शुक्रवार (ता. १०) रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वर दिंडी सोहळा व प्रदक्षिणा सायंकाळी साडेचार ते सात यादरम्यान होणार आहे. शुक्रवारी रात्री व शनिवारी (ता. ११) सकाळी साडे आठ वाजता दिगंबर महाराज नरवडे (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दररोज रात्री हरिकीर्तन संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

Akola News : अकोल्यात गॅस संकट तीव्र! १० दिवसांपासून सिलिंडर नाही; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT