पुणे

मांदळेवाडीत मंगळवारपासून यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती

CD

पारगाव, ता. ११ : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री हनुमान यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. १४) व बुधवारी (ता. १५) बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून, विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण रोख साडेचार लाख रुपये, तसेच एक मोटारसायकल, दोन फ्रिज, दोन एलसीडी टीव्ही, दोन सायकली, दोन कुलर व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच, बुधवारी (ता. १५) रात्री ९ वाजता हिंदवी पाटील प्रस्तुत ‘हिऱ्याची हिरकणी’ हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
बैलगाडा शर्यतीमधील विजेत्या प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये व फळी फोडसाठी दोन फ्रिज, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये व फळी फोडसाठी दोन एलसीडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये व फळी फोडसाठी दोन सायकली, चतुर्थ क्रमांकासाठी ३१ हजार रुपये व फळी फोडसाठी दोन कुलर बक्षीस दिले जाणार आहे. एक नंबर फायनलसाठी ३१ हजार एक रुपये, दोन नंबर फायनलसाठी २१ हजार एक रुपये, तीन नंबर फायनलसाठी ११ हजार एक रुपये, चतुर्थ फायनलसाठी नऊ हजार एक रुपये, घाटाचा राजा ११ हजार १११ रुपये व चषक, वीस फुटांवर कांडे जोडणाऱ्या बैलगाड्यास पाच हजार ५५५ रुपये व दोन दिवसांत सर्वांत आतून येणाऱ्या गाड्यास एक मोटारसायकल बक्षीस देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT